Type Here to Get Search Results !

पैशांच्या वादातून गोळी झाडून ३९ वर्षीय व्यक्तीचा खून!



धुळे : धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चिनू पोपली या ३९ वर्षाच्या व्यक्तीची दोन अज्ञातांनी अग्निशस्राद्वारे गोळीबार करत हत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे समोर आले.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शहरातील कुमार नगर भागात चिनू पोपली हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्य करतो. तो रात्री घरी नसताना त्याच्या घरी आलेल्या काही जणांनी त्याच्या पत्नीला चिनू कोठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी बाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर संशयीत दुचाकीवरून निघून गेले.घरी आलेल्या त्या संशयीतांबाबत चिनू पोपली याच्या पत्नीने त्याला फोनवरून माहिती दिली, व काही वेळातच चिनू घराजवळ आल्यानंतर काही जण पुन्हा परत आले व त्या ठिकाणी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातच त्यांनी थेट आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर काढून चिनू पोपली याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चिनू जागीच कोसळला त्यानंतर या सर्वांनी त्या ठिकाणाहून पोबारा केल्यानंतर पत्नी व परिसरातील नागरिकांनी चीनूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु तोपर्यंत चिनूचा मृत्यू झाला होता. 



दरम्यान, घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ही हत्या पैशांच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले अद्याप एक जण फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies