Type Here to Get Search Results !

गर्लफ्रेंडने किस करताच बॉयफ्रेंडचा मृत्यू; जाणून घ्या काय झाले...!



मुंबई : अमेरिकेत एक महिला जेलमध्ये असलेल्या आपल्या प्रियकराला भेटायला गेली. तिथे तिने त्याला किस केला. पण किस करताच प्रियकराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले असून तिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.



एका वृत्तानुसार, अमेरिकेतील टेनेसी येथील ३३ वर्षीय महिलेचा प्रियकराला ११ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. दरम्यान, त्याला ड्रग्जचं व्यसन असल्यानं त्याची प्रेयसी त्याला ड्रग्ज पुरविण्यासाठी तोंडात ड्रग्ज घेऊन जायची. तिथे गेल्यानंतर किस करण्याचे नाटक करत ती त्याला ड्रग्ज देत होती. मात्र, यावेळी तिने तोंडात आणलेले ड्रग्ज जास्त होते. जेव्हा प्रियकराच्या तोंडात हे ड्रग्ज गेले तेव्हा ते थेट त्याच्या घशात गेले आणि तो बेशुद्ध झाला.



दरम्यान, पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी ३३ वर्षीय महिलेला अटक केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies