लग्नाच्या दीड महिन्यातच पती- पत्नीचा अपघात; अपघात दोघेही मृत्युमुखी!औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा- पारोळा फाट्यावर भरधाव क्रूजरने मोटरसायकला जोरदार  धडक दिली. या धडकेत पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला.सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील रहिवासी असलेले दुर्गाबाई आणि सागर सपकाळ हे पती– पत्‍नी गावाकडे परत जात असताना समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही रसत्यावर  फेकले गेले. व पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान, या पती पत्नींच्या लग्नाला अवघा दीड महिना झाला होता. दीड महिन्यातच काळाने घाला घातला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured