Type Here to Get Search Results !

हरिहरेश्वर संशयित बोट प्रकरण; बोटची सापडली माहिती!



रायगड : हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयित स्पीड बोट आढळून आली. या बोटीमध्ये एके-४७ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटीमध्ये एकूण तीन बंदुकांनी भरलेली बॅग आढळून आली आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिलेत.



दरम्यान, ही बोट आढळून आलेली बोट ही एक ऑस्ट्रेलियन बोट असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. या बोटीचे नाव लिडिहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉंडरर्स गन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे सदर बोटीचे कप्तान असून ही बोट मसकत येथून युरोपकडे जाणार होती. 26 जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि बोटीवर असलेल्या खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी १ वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies