Type Here to Get Search Results !

सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी राहणार बँक बंद; तुमच्या बँकांमधील कामांचे करा नियोजन!नवी दिल्ली: जर तुमचे सप्टेंबर महिन्यात बँकांमध्ये कामे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यात बँकांना १२ दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकेांना सुट्ट्या कधी आहेत, याची यादी पाहणे तुमच्यासाठी  महत्वाचे आहे.पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये, सुमारे १३ दिवस बँका बंद राहतील. तसेच ऑगस्टमधील शेवटचे काही दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. चौथा शनिवार २७ ऑगस्ट रोजी आणि दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी रविवार आहे, त्यामुळे हे दोन दिवस सुट्टीचे असणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथी आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. तसेच, सप्टेंबर महिन्यातील सुट्टी खालीलप्रमाणे:

१ सप्टेंबर २०२२ – गणेश चतुर्थीनिमित्त बँकेला सुट्टी आहे.

४ सप्टेंबर २०२२ - रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. 

६ सप्टेंबर २०२२ - झारखंडमध्ये विश्वकर्मा पूजेनिमित्त बँका बंद राहणार. 

७ आणि ८ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम, कोची येथे ओणमनिमित्त बँका बंद असणार आहेत.

९ सप्टेंबर - गंगटोकमध्ये इंद्रजातावर बँकांना सुट्टी राहणार.

१० सप्टेंबर श्री नरवणे गुरु जयंतीनिमित्त तिरुअनंतपुरम, कोची येथे बँक सुट्टी असणार आहे.

११ सप्टेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. 

१८ सप्टेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील. 

२१ सप्टेंबर श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका बंद राहतील. 

२४ सप्टेंबर चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असणार आहे. 

२५ सप्टेंबरला रविवारी साप्ताहिक सुट्टी. 

२६ सप्टेंबर रोजी - जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या स्थापनेला बँकांना सुट्टी आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies