Type Here to Get Search Results !

तुमचे फेसबुक अकाऊंट होऊ शकत हॅक ; ‘अशी’ घ्या काळजी!



पुणे : पुण्यात बोगस फेसबुक खात्यांचा गैरवापार करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पैशाची गरज आहे, असं सांगून फेसबुकवरून अनेक युजर्सकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे. सायबर हल्लेखोरांनी बोगस फेसबुक खाते तयार करून ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरु केला आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केले आहे. 



फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यास खालील कृती करा: 

फेसबुकच्या ग्रीव्हनसवर जाऊन तात्काळ नोंद करा

सायबर पोलिसांकडे तात्काळ तक्रार नोंदवा.

तक्रार नोंदणी क्रमांक पोलिसांना कळवा.

हॅक झालेले खाते बंद करण्यासाठी पोलिसांशी संपर्क करा.

आर्थिक फसवणूक झाल्यास बँकेला तात्काळ माहिती द्या.


फेसबुक वापरताना खालीलप्रमाणे  काळजी घ्या:

ईमेल,फेसबुक पासवर्ड कायम बदलत राहा.

अक्षरे, अंक चिन्हाचा वापर करून पासवर्ड मजबूत करा.

वैयक्तिक माहिती समाज माध्यमाद्वारे सार्वजनिक करू नका.

अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.

मोबाईल, टॅब, लॅपटॉप कॉम्प्युटर अशा डिवाईसमध्ये अँटीव्हायरस अपलोड करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies