Type Here to Get Search Results !

प्रेमीयुगुलाची आत्महत्या; प्रेयसीचा सहा महिन्यांपूर्वीच पार पडला होता विवाह!



वाशिम: ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रेमीयुगुलाने शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी फॉरेस्ट रामनगर येथील अडाण जलाशयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शंकर एकनाथ खिराडे व खुशी लक्ष्मीकांत मेहता अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ते दोघेही कारंजा येथील रहिवासी आहेत.  मृतक दोघेही एकमेकांचे शेजारी असून, यातील मुलगी विवाहित आहे, तर मुलगा अविवाहित आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मुलीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह पार पडला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती माहेरी राहत होती. ३ ऑगस्ट रोजी दोघेही घराबाहेर पडले आणि उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेाधाशोध केली असता ते सापडले नाहीत.


 

दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी फॉरेस्ट रामनगर येथील अडाण जलाशयातील विहिरीजवळ त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना आढळून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies