Type Here to Get Search Results !

"मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली...” : ‘यांनी’ भर सभागृहात गुलाबराव पाटलांना सुनावले!

 



मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे संतापलेल्या पाहायला मिळाल्या. "मंत्री तुम्ही तुमच्या घरी", अशा शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावले आहे. 



शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासाठी वारंवार निर्देश दिले तरी ते खाली बसले नाहीत. 



दरम्यान, "गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना सांगावं लागतंय. चौकात आहात का तुम्ही?", असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर गुलाबराव पाटील यांनी "मी मंत्री आहे", असं म्हटले. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि "मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा", अशा कठोर भाषेत गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हे यांनी सुनावले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies