Type Here to Get Search Results !

'या' कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार!



औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौरा केला होता. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती. आता त्यांचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे अशी तक्रार आनंद कस्तुरे यांनी केल्यानंतर चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकारी सांगितले आहे.परंतु,  पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.



प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे,  तसेच रात्री 10 नंतर सुद्धा लाऊडस्पीकरवर कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे गुन्हा दाखल करा अशी मागणी कस्तुरे या व्यक्तीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies