Type Here to Get Search Results !

मित्राच्या बायकोला पाहून वारंवार अश्लील चाळे व इशारे केल्याने पोलिसाला...!




मुंबई: वरळी पोलीस कॅम्प परिसरात शेजारी राहणाऱ्या सहकार्याच्याच बायकोची छेड काढणाऱ्या पोलीस शिपायावर वरळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी पोलीस कॉन्स्टेबल व तक्रारदार महिला या शेजारीच राहतात. वरळी पोलीस कॅम्प परिसरातील एक पोलीस शिपाई आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला रोज अश्लिल इशारे करायचा. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल व तक्रारदार महिला या शेजारीच राहतात. रोजच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर वरळी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, पीडित महिलेला पाहून पोलीस शिपाई वारंवार अश्लील चाळे व इशारे करत असल्याचे पीडितेने आरोप केले आहेत. 


दरम्यान, वरिष्ठांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी सचिन सणस याच्यावर ३५४ (अ), ५०९ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies