Type Here to Get Search Results !

मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप सक्रीय;अमित शाह उतरणार मैदानात?



मुंबई: राज्यात नवे सरकार स्थापन केले. यानंतर आता दिल्लीतून राजकीय हालचाली वाढल्या असून, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. 



शिंदे-फडणवीसांची सत्ता आल्यानंतर भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आक्रमकपणे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेची लढाई लढण्यासाठी अमित शाह जातीने मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमित शाह गणेशोत्सवाच्या काळात ५ सप्टेंबर रोजी मुंबईत एक दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies