Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या!



कामशेत : मावळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. यावेळी कामशेत पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.२) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पुणे मंगळवारी (दि. २) दुपारी ३:३० च्या सुमारास कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पोस्को, ३६३, ३०२ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.



दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies