Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार ३ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. सहकार्‍यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल.



वृषभ:

खर्च जपून करावा. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात.



मिथुन:

नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा.



कर्क:

हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल. चिंतामुक्त व्हाल. व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल.



सिंह:

वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.



कन्या: 

नवीन तंत्र शिकून घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे.



तूळ:

संमिश्र घटनांचा दिवस. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरीत सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.



वृश्चिक:

व्यवसायिकांना नवीन संधी चालून येतील. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल. आर्थिक स्थिती सुधारता येईल.



धनू:

कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.  उत्साहवर्धक घटना घडतील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. 



मकर:

दिवस मजेत जाईल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल.



कुंभ:

भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा.



मीन:

जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. वेळ जपून वापरावा. उगाच चिडचिड करू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies