Type Here to Get Search Results !

महादेवाच्या मंदिराकडे जाताना टेम्पो उलटला; एक जागीच ठार, अन्य १३ जण जखमी!



औरंगाबाद: औरंगाबादच्या वेरुळ घाटात रविवारी, दुपारी चार वाजता भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोमधील एक जण जागीच ठार झाला आहे. तर अन्य १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात झालेल्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबादच्या खुलताबाद वेरूळ रस्त्यावरील चांगोबा वळणावर भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून अपघात झाला आहे. नांदगाव तालुक्यातील पिनाकेश्वर येथील मोठा महादेव मंदिराकडे भाविक जात होते. औरंगाबादमधील भाविक हे वेरूळ येथून पाणी घेऊन जाण्यासाठी गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील तरुण एका टेम्पोमधून वेरूळ येथे जात होते. रविवारी दुपारी ४ वाजता या रस्त्यादरम्यान, हा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाली आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies