Type Here to Get Search Results !

‘अशी’ सुसाईड नोट लिहित मुलीची महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या!



औरंगाबाद: शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली  आहे. या दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे सापडल्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची  माहिती पोलिसांनी दिली आहे.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, आरती सर्जेराव कोल्हे (वय 19, रा. गुरुपिंप्री, ता घनसावंगी जि. जालना) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 'मी खूप साधी आहे बारावीपर्यंत खेडेगावात शिकले. मला शहरी वातावरणाची सवय नाही. शहराशी जुळवून घेताना कुचंबना होते असे तिने चिठ्ठीत लिहिले.



दरम्यान, या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies