Type Here to Get Search Results !

कारमधूनच शहरभर चालवत होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी सापळा रचत केली अटक!



फरीदाबाद: फरीदाबादमध्ये देहविक्रय करणाऱ्या तरुणींना कारमधूनच शहरभर फिरविले जात होते. अशा सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.



प्राप्त माहितीनुसार, पैसे मिळताच तरुणी कोणत्याही हॉटेलमध्ये गिऱ्हाईकासोबत जात होत्या. हे रॅकेट चालविणारे लोक तरुणींशी फोनवरूनच संपर्क करत असायचे. यानंतर त्या तरुणी तिथे पोहोचविल्या जायच्या. गिऱ्हाईकाला फोटो पाठविले जायचे. त्याला निवडायला सांगितले जायचे. यानंतर एक कार गिऱ्हाईकाने सांगितलेल्या ठिकाणी यायची, पैसे घेतले जायचे आणि तरुणी त्यावेळी कारमधून खाली उतरायची. हा सगळा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होता.



दरम्यान, पोलिसांनीच कस्टमर बनून त्या रॅकेटला फोन केला. एका हॉटेलजवळ बोलविले. साध्या वेशात असलेल्या पोलिसाला पलीकडून तरुणींचे फोटो पाठविण्यात आले. त्याने त्यातील एक तरुणी निवडली. त्या तरुणीला घेऊन दहाच मिनिटांत कार तिथे आली. पोलिसाने कारमध्ये बसलेल्या महिलेकडे सहा हजार रुपये दिले. तिने त्यातील दोन हजार रुपये कारच्या चालकाला दिले. तसेच तरुणीला कारमधून उतरविले. त्यानंतर पोलिसाने सिग्नल देताच पोलिसांची टीम तिथे पोहोचली आणि महिलेसह कारमधील तीन तरुणी आणि एक चालक असे पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.  



तसेच, आरोपींना एनआयटी पोलीस ठाण्यात नेऊन वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies