शिक्षकाची फसवणूक; अज्ञाताने पॅनकार्डचा नंबर वापरुन केले ३ कोटी ९६ लाख ८७ रुपयांचे व्यवहार!बीड : बीडमध्ये एका शिक्षकाच्या पॅनकार्डचा क्रमांक वापरून अज्ञात व्यक्तीने जीएसटी खाते उघडल्याचा प्रकार घडला आहे. तसेच, या प्रकरणात ३ वर्षाच्या कालावधीत तब्बल ३ कोटी ९६ लाख ८७ रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि, अनिल भानुदास जरे रा. आदित्यनगर , बीड असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. २४ जुलैला इन्कमटॅक्स फाईल करण्यासाठी शिक्षक जरे हे गेले असता त्यांना त्यांच्या पॅन क्रमांकावर जीएसटीआयएन नंबर सुरू केल्याचे समोर आले.  सदरील जीएसटीआयएन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने व्यवसायाचे नावे भानुदास इंड्रस्ट्रीज तर प्रोप्रायटर म्हणून अनिल भानुदास जरे अशा नावाचा गैरवापर केला आहे.तसेच,    या अज्ञात व्यक्तीने २०२०-२१ मध्ये आर 3 बी नुसार ३२ लाख ५० हजार ४५ , आर -1 नुसार ५ लाख ८२ हजार , २०२१-२२ मध्ये १ कोटी ९० लाख १० हजार ७०० तर आर -1 नुसार १ कोटी ६८ लाख ४६ हजार रुपयांचा व्यवहार केला असल्याचे समोर आले.  दरम्यान, याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured