Type Here to Get Search Results !

शाळेसमोरून अपहरण करून धावत्या कारमध्ये केला बलात्कार!



वर्धा : वर्धा जिल्ह्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत निघाली असताना दोघांनी चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केले. त्यानंतर धावत्या कारच नराधमांनी तिचे लचके तोडले. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  जिल्ह्यातील पुलगाव येथील, 13 वर्षीय पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता, आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये खेचले. पीडितेचे अपहरण करताच, नराधमांनी वेगाने कार पळवली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. दरम्यान, धावत्या कारमध्येच आरोपी सुमेध याने पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 



दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पीडितेने आपल्या आईला घडलेली सर्व घटना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच, आईने तातडीने पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies