Type Here to Get Search Results !

अंगावर एकही कपडा न घालता अभिनेत्रीचा अतिबोल्ड लूक!मुंबई - अतरंगी पोशाख करत त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा हटके स्टाईल अंगप्रदर्शन केले आहे. यावेळी, तिने शरीरावर कुठलाही कपडा परिधान केला नसून केवळ पेपर चिकटवला आहे. सोशल मीडियावर तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून काहींना तिला उर्फी नाही तर तू बर्फी आहेस, असे म्हटले आहे. सोशल मीडियावर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त फोटोशुटमुळे धुमाकूळ घालणाऱ्या उर्फी जावेदने एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, तिने अंगावर एकही कपडा परिधान केला नसून तिने शरीरावर चांदीचा पेपर चिकटवला आहे. शरिराच्या पुढील भागावर तिने हे चांदी पेपरवर्क केलं असून या पेपरनेच शरीर झाकलं आहे. त्यामुळे, तिचा हा अतिबोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 विशेष म्हणजे तिचा हा लूक पाहून ती टॉपलेस झालीय, असं एकक्षण जाणवणार नाही. मात्र, फोटोचे नीट निरीक्षण केल्यास तिच्या अंगावर चांदीच्या पेपरवर्कने शरीर झाकल्याचे लक्षात येईल. कधी पोत्याने, कधी वर्तमानपत्राने, कधी दगडाने आपले शरीर झाकून चाह्त्यांसमोर येणाऱ्या उर्फीने आता चक्क चांदीच्या पेपरने आपले शरीर झाकले आहे. तिचा हा लूक इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "इल्यूमिनेटिंग, यासाठी मी चांदीच्या पेपर वर्कचा वापर केला आहे, असे कॅप्शन उर्फीने दिले आहे. चाहत्यांना तिचा हा हॉट अवतार चांगलाच भावला असून अनेकांनी हॉट इमोजी, लाईक, लव्ह दिलं आहे. (सौ.लोकमत)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies