Type Here to Get Search Results !

नागपंचमी विशेष: जाणून घ्या का नागाची पूजा करतात?



आटपाडी:  सोमवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. काही भागांत चिखलाचा नागदेवता करतात. तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात. काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करतात. 



भारत हा कृषिप्रधान देश आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. ब्राह्मणाला भोजन घालून स्वतः एकभुक्त राहावे. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहात नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.



गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने त्याचा गळा काळा-निळा झाला, तो ‘नीळकंठ’ झाला. गळ्याची होणारी आग शांत करण्यासाठी त्याने थंडगार अशा नागाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले, अशी कथा आहे.



सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावाची परंपरा :

सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेला बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध होते. नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे 100-125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित होत. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. यांतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन वर्षाच्या बालकापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत. शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांतही प्रसिद्ध होती. (सौ. abp माझा)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies