Type Here to Get Search Results !

दुधाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी पुन्हा वाढ; शेतकऱ्यांना दिलासा!



मुंबई : सध्या  अमुलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ होणार आहे. दूध खरेदी दरातही वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.



उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे अमूल गोल्ड दुधाचे दर प्रतिलीटर ६२ रुपये, अमूल शक्ती दूध ५६ रुपये, आणि अमूल ताजाचा दर ५० रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड ३१ रुपये आणि अमूल ताजा २५ रुपयांना तर अमूल शक्तीचा दर २८ रुपये असेल.



दरम्यान,  म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यासंबंधी अमूल आणि मदर डेअरीने अधिकृतपणे याबाबतची माहिती दिली आहे. दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार असला तरी, सर्वसामांन्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies