Type Here to Get Search Results !

उपचारांच्या नावाखाली सासरच्या सर्व मंडळीसमोर मांत्रिकाने महिलेला नग्न करून घातली आंघोळ!



पुणे: पुण्यातील एका मांत्रिकाने एका महिलेवर उपचारांच्या नावाखाली नग्न करुन आंघोळ घातल्याची घटना घडली आहे. घरातील भानामती नाहीशी व्हावी, व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी आणि घरांमध्ये सुख शांती नांदावी याकरता पुण्यातील मांत्रिकाने महिलेला नग्न आंघोळ घातली. 



प्राप्त माहितीनुसार,  या महिलेचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून घरातील मंडळींनी या महिलेला त्रास देऊन तिच्याबरोबर अनिष्ट प्रथा सुरू केल्या होत्या. आरोपींनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरुन पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी नेलं. तिथं तिला मांत्रिकासह सर्व मंडळींच्या समोर नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले. 



दरम्यान, पीडितेला घरातल्या सगळ्यांसमोर मांत्रिकांने तिला नग्न आंघोळ घातल्याने याप्रकरणी पीडित महिलेचा पती, सासरे, सासू यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies