Type Here to Get Search Results !

“...तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत”; आमदारांच्या राड्यानंतर शिंदे गट आक्रमक!



मुंबई:  राज्याचे पावसाळी अधिवेशानाच्या आजच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांवर धावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज सकाळपासून विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी गटाच्या आमदारांनी विरोधकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.



आमदारांच्या या सर्व राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले,अनिल देशमुखे, अनिल परब, सचिन वाझे असतील कोविड मधला भ्रष्टाचार असेल हे सर्व आम्ही बोहेर काढलं ते सत्य त्यांना झोंबलं. आमचं आंदोलन झाल्यानंतर विरोधक आले असते तर त्यांना पायऱ्या मोकळ्या करुन दिल्या असत्या, मात्र आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही देखील जशास तसं उत्तर दिलं. शिवाय त्यांनी डिवचलं तर आम्ही कोणाला सोडणार नाही असेही भरत गोगावले यांनी भाष्य केले. ,



तसेच ते पुढे म्हणाले, 'आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही मात्र अंगावर आलात तर शिंगावर घेऊ' असे वक्तव्य गोगावाले यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies