Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार ९ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :-

अनोळखी व्यक्ती मदत करतील. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. मेहनतीला पर्याय नाही. विरोधक नामोहरम होतील. विवाह बोलणी लांबणीवर पडू शकतात.



वृषभ:-

विचारपूर्वक निर्णय घ्यावा. उगाच तर्क-वितर्क करत बसू नका. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. 



मिथुन:-

कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. आंधळा विश्वास ठेऊ नका. गोडी-गुलाबीचे धोरण ठेवावे. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. 



कर्क:-

घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका. आहारावर नियंत्रण ठेवावे. मन विचलीत होऊ शकते.  जुनी कामे आधी हातावेगळी करावीत. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. 



सिंह:-

चर्चेतून मार्ग काढावा. गुंत्यातून बाहेर पडाल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत.



कन्या:-

प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. भडक मार्गाचा अवलंब करू नका. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.  मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. 



तूळ:-

समस्यांचे निराकरण होईल. काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. 



वृश्चिक:-

जुने गैरसमज दूर होतील. पित्त विकारात वाढ होऊ शकते.  दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल. अवाजवी खर्च टाळावा.



धनू:-

सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल. उपासनेत मन रमवावे. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. 



मकर:-

घरातील वातावरण शांत ठेवावे. वैचारिक स्थैर्य जपावे. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत. नियोजित कामे पार पडतील. यांत्रिक कामात लक्ष घालाल.



कुंभ:-

जवळच्या मित्रांशी वाद घालू नका.  वादाचे मुद्दे टाळावेत. चैनीत दिवस घालवाल. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील. 



मीन:-

आरोग्यात सुधारणा होईल. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies