मुंबई: २०१४ व २०१९ या काळातील नोकर भरतीतील मराठा समाजातील रखडलेल्या जागांच्या नियुक्त्यांचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, अशी माहिती स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ.धनंजय जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ.धनंजय जाधव यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या संदर्भात आझाद मैदान येथे उपोषण केले होते. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रखडलेल्या जागांवर नियुक्त्या करण्याचे आदेश दिले आहेत.