नोएडा : नोएडातील एका महिलेने रिक्षाचालकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नोएडातील रस्त्यावर एका रिक्षा चालकाने कारला धक्का दिल्याने संतापलेल्या महिलेने रिक्षाचालकाला शिवीगाळ करत एक नाही, तर तब्बल १७ वेळा कानशिलात लगावली. तसेच, चालकाला मारहाण करत असताना कपडेही फाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, महिला मारहाण करत असताना रिक्षाचालक दिलगीरी व्यक्त करत कौंटुबिक तणावामुळे घाईत रिक्षा चालवत असल्याचे सांगताना व्हिडिओत दिसत आहे. तरीही आक्रमक झालेली महिला चालकाला मारहाण करते. याप्रकरणी नोएडा पोलिसांनी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केली आहे.