Type Here to Get Search Results !

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या कारण!



पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार ही तक्रार दाखल करण्यात आली. पुण्यात उदय सामंत यांच्यावर जो हल्ला करण्यात आला होता, तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी केला होता. याचाच निषेध आणि तक्रार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 



तसेच, म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशी बोचरी टीका पडळकरांनी विरोधी पक्षांवर केली होती. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पुण्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाहीत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, असं पडळकर काल म्हणाले होते.



दरम्यान, याचाच निषेध आणि तक्रार म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन त्यांना तक्रार सुपूर्द केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नेत्या रूपाली ठोंबरे आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies