Type Here to Get Search Results !

पैशाच्या वादातून हॉटेल मालकाने केली नोकराची हत्या!



वर्धा: पैशाच्या कारणातून झालेल्या वादातून मद्यधुंद हॉटेल मालकाने नोकराला दुचाकीवर बसवून पिपरी मेघे परिसरातील जुना पाणी चौकातील उड्डाणपुलावर नेऊन नोकराच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार करुन हत्या केल्याची घटना घडल्याचे आज सकाळी समोर आले आहे. अमोल मसराम (३२) रा. कारला चौक असे मृतकाचे नाव आहे. तर महेश मसराम उर्फ महेश मॅटर असे अटक केलेल्या आरोपी हॉटेल मालकाचे नाव आहे.



याबद्दल अधिक महिती अशी कि, आरोपी महेश मसराम उर्फ महेश मॅटर याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चौकात हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मृतक अमोल मसराम हा काम करीत होता.मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी महेश मसराम याने अमोलला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्यासुमारास आरोपी महेश हॉटेलात गेला. तेथे त्याने दारु पिली शिवाय नोकरालाही दारु पाजली. त्यानंतर आरोपी महेश याने अमोलला दुचाकीवर बसवून बायपास रस्त्याने पिपरी मेघे येथील जुना पाणी परिसरातून जाणाऱ्या उड्डणपुलावर नेले.तेथे पुन्हा आरोपी महेश मॅटर याने मृतकाची वाद करुन जवळील चाकूने त्याच्या गळ्यावर पाठीवर तसेच हातापायावर सुमारे दहा ते बारावेळा सपासप वार करुन तेथून निघून गेला. अमोलचा मृतदेह उड्डणपुलावरच रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहिला होता.



दरम्यान,  पहाटेच्या सुमारास नागरिकांना मृतदेह दिसून येताच त्यांनी तत्काळ रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि मृतकाच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवला आहे. आरोपी महेशसोबत आणखी एक जण असल्याचा संशय रामनगर पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies