Type Here to Get Search Results !

पुलवामामध्ये दहशतवादी ग्रेनेड हल्ला; हल्ल्यात एकाचा मृत्यू, दोघे जखमी!

  


श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी ग्रेनेड हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड फेकले. मोहम्मद मुमताज असे मृत मजुराचे नाव असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी आहे. तर मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही बिहारमधील रामपूरचे रहिवासी आहेत. दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. 



दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या कामगारांवर हल्ले वाढवले होते, पण गेल्या दोन महिन्यांपासून अशा टार्गेट किलिंगच्या घटना कमी झाल्या होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies