Type Here to Get Search Results !

पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे पडू शकते महागात; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!



मुंबई: पतीने पत्नीला सतत टोमणे मारणे, स्वत:च्या पत्नीची तुलना इतर महिलांशी करणे हे मानसिक छळाचे क्रूर कृत्य असल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 



न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सुधा यांच्या खंडपीठाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवले आहे. या प्रकरणातील पत्नीने असा आरोप केला होता की, भावांच्या पत्नी असो किंवा दिसण्याचा विषय असो, तू कधीच माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही, असे तिचा पती सतत म्हणायचा. तर इतर महिलांची तुलना करताना आपल्याला सतत  हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप याचिकाकर्त्या महिलेने पतीवर केला होता.



दरम्यान, महिलेच्या याच याचिकेवरती निर्णय देताना आता न्यायालयाने महत्वपुर्ण निरिक्षण नोंदवले असून आपल्या पत्नीची तुलना इतरांशी न करण्याबाबतचा सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे, टोमणे मारणे बंद करायला हवे अन्यथा कायद्याने त्यांना ते महागात पडू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies