Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स!



मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी ईडी वर्षा राऊत यांची चौकशी करणार आहे.



दरम्यान, शुक्रवार,५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावले आहे. खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीने विशेष न्यायालयाकडे राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, न्यायालयाने मान्य केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies