Type Here to Get Search Results !

“शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही की, कुणीही उचलून खिशात टाकावी”



मुंबई:  ' दसरा मेळावा आमचाच होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे', असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.



तसेच ते पुढे म्हणाले, 'शिवसेना व शिवसैनिक आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही की, कुणीही उचलून खिशात टाकावी. शिवसेनेला ५६ वर्ष झाली आहेत. असे किती ५६ आले गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्ताने मोठी झाली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.



दरम्यान, शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर आज विश्व हिंदू परिषद , बजरंग दल यांचे कार्यकर्ते आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच हिंगोलीतील भाजप,काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies