Type Here to Get Search Results !

१० भाविकांना उडवले ट्रेलरने; ५ जण जागीच ठार!



जयपूर :राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री रामदेवराकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांना एका ट्रेलरने धडक दिली. या अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  ही घटना पाली जिल्ह्यातील रोहत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने भाविक पायी रामदेवरा येथे जात होते. यावेळी रोहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरतीया बोर्डाजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने धडक दिली. ट्रेलरने १० भाविकांना धडक दिली. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले.



दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रोहत पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. भीलवाडा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खेमना गावातील रहिवासी पप्पू भील आणि त्याचे साथीदार पायी रामदेवरा येथे जात होते. ते रोहत पोलीस स्टेशन हद्दीतील मुकनपुरा गावाची हद्द ओलांडत असताना मागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. यामुळे पप्पू, गिरधारी आणि पवन यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies