Type Here to Get Search Results !

मित्रावर बलात्काराचा आरोप; धमकावल्याप्रकरणी केदार दिघेंवरही गुन्हा दाखल!



ठाणे:  ठाणे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप एका महिलेने केला आहे. सदर गुन्हा हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, एका महिलेचा केदार दिघे यांच्या मित्रावर बलात्काराचा आरोप आहे. या बलात्कार पीडित महिलेने केदार दिघे यांनी धमकावल्याची तक्रार पोलिसात जाऊन केली. त्यानंतर पीडित महिलेच्या जबानीवरून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार पीडित महिलेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित महिलेच्या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्या त्यांच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान,  केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies