Type Here to Get Search Results !

“मी कारागृहात ४ वेळा चक्कर येऊन पडलो त्यामुळे मला....”; ‘यांचा’ कोर्टात युक्तीवाद!



मुंबई: 'मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी', अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी स्वत: युक्तीवाद केला. 



'मी कारागृहात चार वेळा चक्कर येऊन पडलो, माझी तब्येत स्थिर नसून मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यात यावी', असा युक्तीवाद अनिल देशमुख यांनी केला. मात्र या संदर्भात न्यायधीश राहुल रोकडे यांनी अनिल देशमुख यांना कोर्टात लेखी अर्ज सादर करा असा सल्ला दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने लेखी अर्ज सादर करण्यात आला. परंतु, या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 



दरम्यान, चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख हे तुरूंगात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार आपल्याला उपचारासाठी परवानगी द्यावी अशी मागणी अनिल देशमुख करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies