यवतमाळ:'दिल्लीला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटतात आणि भाजप म्हणेल तेच करताय, तसेच सध्या देशात भाजप कपटीपणाचा रेकॉर्ड करत असून भाजप विरोधकांचा आवाज दाबत आहे.
तसेच, “भाजपाचे टार्गेट केवळ काँग्रेस आहे. त्यामुळे तपास यंत्राणांना मागे लावून सोनिया गांधी आणि राहुल गांधीना ते त्रास देत आहेत. भाजपचे राजकारण म्हणजे लोकशाही संपवणार आहे. सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते. श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याच दिशेने देश वाटचाल करत असल्याची टिकाही राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा अखिल भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करणारी खरी शिवसेना नाही. शिवसेनेतून भाजपबरोबर सरकारमध्ये बसणारे भाजपचेच लोक आहेत असेही वक्तव्य त्यांनी केले.