Type Here to Get Search Results !

पतीनेच पत्नीचा गळा आवळून केला खून!



नाशिक: नाशिकच्या वडाळा गाव परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली  आहे. रिझवान इसाक पठाण असे आरोपी पतीचे नाव असून हुमेरा रिझवान पठाण असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान, पत्नीची हत्या करून स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर होत घटनेची माहिती दिली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, गेल्या अनेक दिवसापासून रिझवान आणि हुमेरा या दोघा पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. या दोघांमधील हाच वाद टोकाला गेल्याने पती रिझवान याने रागाच्या भरात पत्नी हुमेराचा मोबाईल चार्जरने गळा आवळला त्यातच तिचा मृत्यू झाला. 



दरम्यान, रिझवान याने आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेह घरातच ठेऊन तो थेट इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला.व त्यानंतर त्याने सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास  पोलीस करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies