Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरूवार ४ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

काही बदल त्रस्त करू शकतात. अविचाराने वागून चालणार नाही. समस्या निराकरणाचे उपाय सापडतील. परिस्थितीनुरूप संयम बाळगावा. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. 



वृषभ:-

मुलांच्या आवडी निवडी पुरवाल. विलंबाने का होईना पण यश मिळेल. मनाप्रमाणे दिवस घालवाल. काही सवयी बदलून पहाव्यात. मेहनतीला पर्याय नाही.



मिथुन:-

अवास्तव खरेदीचा मोह टाळावा. आज प्रेमाची अनुभूति येईल. निराशा टाळून कामाला लागावे. मन काहीसे सैरभैर राहील. समोरील प्रत्येक गोष्टीत रममाण व्हाल.



कर्क:-

प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. समोर आलेली संधी ओळखावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. आपली आकांक्षा पूर्ण होईल.



सिंह:-

खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. अनुभावातून धडा घ्याल. जोडीदाराच्या वागण्याचा अचंबा वाटेल. धार्मिक कामात मन गुंतवाल.



कन्या:-

सामाजिक बांधीलकी जपा. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. नवीन अनुभावातून शिकाल. व्यावसायिक चढउताराकडे लक्ष ठेवावे. स्वत:च्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.



तूळ:-

अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कमिशन मधून चांगला लाभ होईल.



वृश्चिक:-

जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. नातेवाईकांकडून सुखद बातमी मिळेल. भावनिक घटना घडू शकतात. आनंददायी दिवस राहील. भागीदारीतून चांगला लाभ होईल. 



धनू:-

घरगुती वातावरण संमिश्र राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामातून समाधान लाभेल. उगाचच मनात चिंतांना घर करू देऊ नका. 



मकर:-

क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल.  कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. कामाचा ताण जाणवू शकतो. प्रकृतीची हेळसांड करू नका. मनोरंजनाकडे अधिक कल राहील. 



कुंभ:-

खाण्यापिण्याची पथ्ये पळावीत.सार्वजनिक बाबीत सहभाग घेऊ नका. मेहनतीला पर्याय नाही.  दगदग व धावपळ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. 



मीन:-

जोडीदाराच्या सहवासात रमाल. आवडता छंद जोपासाल. अति शिस्तीचा बडगा करू नका. मनातील गैरसमज दूर होतील. मन प्रसन्न राहील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies