टेम्पोने उडविले नंतर टिप्परने चिरडले; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू!बीड: पुणे- नगर रोडवरील रांजणगावजवळ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुचाकीवरुन गावी निघालेल्या तरुणाला टेम्पोने धडक दिली, त्यानंतर त्याला भरधाव टिप्परने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबद्दल अधिक माहिती अशी कि, सुनील भगवान डुकरे (२८,रा.सिरसमार्ग ता.गेवराई) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रांजणगाव (जि.पुणे) येथे खासगी कंपनीत नोकरी करायचा. सिरसमार्ग येथे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तो दुचाकीवरुन ४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता गावी निघाला होता. रांजणगावजवळ भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीला धडक दिली , यानंतर तो रस्त्यावर कोसळला. याचदरम्यान समोरुन येणारे टिप्परने त्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ व नातेवाईकांनी रांजणगावला धाव घेतली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured