Type Here to Get Search Results !

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली:  सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही घट झाली.



शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 389 रुपयांनी घसरून 51,995 रुपये प्रति ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 52,384 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.



तसेच, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रतिकिलो 1 हजार 607 रुपयांनी खाली आला. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 56 हजार 247 इतका आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या सत्रात चांदी 57 हजार 854 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies