Type Here to Get Search Results !

“मुख्यमंत्री गुंडांचे सरंक्षण करत असतील तर...”: ‘यांचा’ मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!



मुंबई:  मुख्यमंत्री गुंडांचे सरंक्षण करत असतील तर पोलिस तपास कसा करणार असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात आक्रमक झाले. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपचा पेनड्राइव्ह सभागृहात सादर केला. 



दरम्यान, रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तडिपार करण्याची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत. एका महिलेवर हल्ला होतो आणि आरोपींना संरक्षण दिले जाते यापेक्षा दुसरं दुर्देव कोणते, अशी खंत देखील आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. 



तसेच ते पुढे म्हणाले, "अशा गुंडाना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी असा सवालही त्यांनी केला.व आपल्या आरोपांबाबतचा व्हिडिओ आणि ॲाडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी सभागृहात सादर केला. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण लिखीत उत्तर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies