Type Here to Get Search Results !

कुस्तीपटू पूजा नंदलच्या पतीचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू!



नवी दिल्ली: कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी पदक जिंकणारी कुस्तीपटू पूजा नंदल यांचा पती अजय नंदल यांचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचे दोन सहकारी पैलवान रवी आणि सोनू हे देखील गंभीर आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजयच्या वडिलांनी रवी या पैलवानवर आपल्या मुलाला ड्रग्ज दिल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे.



पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती अशी कि, महाराणी किशोरी महाविद्यालयाजवळ अजयच्या कारमध्ये तिनही पैलवानांनी मद्यपान केले होते, त्यानंतर तिघेही बेशुद्ध पडले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाहिल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अजयचा मृत्यू झाला, तर रवी आणि सोनूची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे.



दरम्यान, मृत अजय नंदल हा गढी बोहर गावचा रहिवासी असून, तो राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies