Type Here to Get Search Results !

पायी चालणाऱ्या शेतकऱ्याला पिकअपने दिली धडक; शेतकरी जागीच ठार!



नंदुरबार - धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा शिवारात बर्डीपाडा येथील सुदाम गावित शेतकरी आपल्या शेतात पायी चालत जात असताना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकपने धडक दिल्याने शेतकरी सुदाम गावित यांचा जागीच मृत्यू झाला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  सुदाम जोलक्या गावित वय 50 राहणार बर्डीपाडा यांचे शेत महामार्गाच्या पलीकडे मासलीपाडा शिवारात असल्याने सकाळी आपल्या शेतात कामानिमित्त जात असताना सुरत हुन धुळे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन चालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेने पायी चालत जाणारे शेतकरी सुदाम गावित यांना मागून जबर धडक देत पिकप वाहन अंगावरून चढवत फरपट नेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.


दरम्यान,  अपघातानंतर पिकप वाहन चालक देविदास रतन पाटील राहणार बांबुर्ली खंडाला जिल्हा धुळे याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु,  स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies