Type Here to Get Search Results !

दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार: राज्य सरकारची घोषणा!



मुंबई: देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. दहिहंडी उत्सवात दहिहंडी पथकात असलेल्या गोविंदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल, गुरुवारीच विधानसभेत घोषणा केली होती. 



दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाली तर, शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies