आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी: दिनविशेष च्या माध्यमातून कोणते महत्वाचे दिवस आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 ऑगस्ट दिनविशेष.1984: भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा जन्म

1960 : भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म

1956 : भारतीय क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू  यांचा जन्म

1900 : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 

क्रांतिसिंह नाना पाटील हे भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि संसदपटू होते. त्यांना 'क्रांती सिंह' म्हणून ओळखले जात असे. ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत त्यांनी 1940  मध्ये सातारा जिल्ह्यात ‘प्रति सरकार’ नावाचे स्वतंत्र सरकार स्थापन केले होते. 

1898 :  आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म

1939 : भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म 

1924  : अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म

1916 : शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर यांचा जन्म

1886 : हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 

2007 : लेखिका   सरोजिनी वैद्य यांचे निधन

 

1993 : अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन 

1930 : आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन 

1929 : ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन

1881 : अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचे निधन 2004 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.

2000: शाजी एन. करुण - मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.

1997 : स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड - या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.

1994 : संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

1977 : TRS-८० कॉम्पुटर - टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.

1960 : नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

1949 : नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - बास्केटबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका आणि नॅशनल बास्केटबॉल लीग यांनी विलीनीकरण करून या असोसिएशनची स्थापन.

1948 : भारतीय अणूऊर्जा आयोग - स्थापना झाली.

1940 : दुसरे महायुद्ध - इटालियन सैन्याने ब्रिटीश सोमालीलँडवर आक्रमण सुरू केले.

1936 : आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

1914 : एडॉल्फ हिटलर याने बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडेस्वतःला सैन्यात दाखल करून घ्यावे असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्ती झाली.

1914 : पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले, तर रोमानियाने आपली तटस्थता जाहीर केली.

1900 : द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी स्थापन झाली.

1859 : अमेरिकन डेंटल असोसिएशनची स्थापना न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाली.

1811 : जंगफ्राऊ शिखर या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.

1783 : माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 35 हजार लोकांचे निधन

1046 : सांताक्लॉज लँड, थीम पार्क - जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले 

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured