मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत भाषण करताना आज पुन्हा एकदा टोलेबाजी केली आमच्या काळात डान्स बार बंद केले होते. मात्र आता ठाण्यात सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी शिंदेंना लगावला.
पवार म्हणाले, “आमच्या काळात तुम्ही डान्स बार बंद केले होते. मात्र, आता ठाण्यात तुमच्या घराशेजारीच सर्रासपणे डान्सबार सुरू आहेत, असा टोला अजित पवार यांनी हाणला. तुम्ही दोघं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू झालेले आहात. कळतच नाही कुठलं नाणं आहे, असा चिमटाही अजित पवार शिंदे-फडणवीस यांना काढला.
दरम्यान, मी स्वत: ठाण्यातील डान्सबार फोडले. तेव्हा गुंडांनी मला टार्गेट केले होतं. पण धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी मला वाचवलं. डान्स बार फोडणारा मी पहिला नेता आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. इतकंच नाही तर, बहुमत सिद्ध केल्यानंतर सोळा डान्स बार फोडणारा मी आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी छातीठोकपणे सांगितलं होते, याच वक्तव्यावर अजित पवार यांनी टोलेबाजी केली.