मुंबई - अधिवेशनच्या टप्प्यात महाविकास आघाडीने महत्वाची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकिला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. विविध मुद्यांवर सरकारची कोंडी कशी करता येईल याबाबतची व्ह्यूरचना या बैठकित आखली जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास ही बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचे भविष्य आणि विधीमंडळातील रणनीती याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.