Type Here to Get Search Results !

अश्विनी देवरे बनल्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन!



नाशिक: आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त करत देशाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील नाशिक पोलीस आयुक्तालाच्या महिला पोलीस अमलदार अश्विनी देवरे यांनी ही कामगिरी केली आहे. कजाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि कालबद्ध वेळेच्या आत स्पर्धा जिंकून त्यांनी आयर्नमॅन या स्पर्धेचा किताब पटकावत यश प्राप्त केलेले आहे. त्यांच्या या यशाने नाशिक आणि महाराष्ट्रसह देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. 



दरम्यान, अश्विनी देवरे यांचे पती गोकुळ नामदेव देवरे हे भारतीय सैन्य दलात 9 पॅरा फिल्ड या युनिटमध्ये श्रीनगर येथे तैनात आहेत. देवरे अपत्याला 12 आणि 7 वर्षांचे दोन मुले वीर देवरे आणि शौर्य देवरे असा त्यांचा परिवार आहे. या अगोदर तत्कालीन नाशिक पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी ही आयर्नमॅन स्पर्धा जिंकली होती. त्यांनतर पाहिल्यांदाच नाशिक पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी अश्विनी देवरे यांनी ही आयर्नमॅनची स्पर्धा जिंकून यश संपादन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies