Type Here to Get Search Results !

मुंबई: इमारतीचा भाग कोसळल्याने दोघांचा मृत्यू!



मुंबई : मुंबईच्या मुलुंड पूर्व भागात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या छताच्या भागात आणखी माणसे  दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुलुंड पूर्वेतील नाणेपाडा भागातील मोती छाया इमारतीत ही घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छताचा काही भाग कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देवशंकर नाथालाल शुक्ला (वय 93 ) आणि अर्खीबेन देवशंकर शुक्ला (वय 87) या दोन वृद्धांचा मृत्यू झाला.



दरम्यान, सदर ठिकाणी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले आहेत. या इमारतीच्या भागात अजून कोणी दबले गेले आहे का, याची शोध मोहिम सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies