Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १२ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष:

आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल. पोटाची तक्रार जाणवू शकेल.  कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. वृषभ:

दिवस गप्पा व मौजमजेत जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. 
मिथुन:

मनोबल वाढीस लागेल.  टीका कारांकडे दुर्लक्ष करावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कर्क:

घाईने निर्णय घेऊ नयेत. कामाचा ताण जाणवेल. निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. सिंह:

कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्याल पार पाडाल. कन्या:

दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. तूळ 

रागावर नियंत्रण ठेवावे. ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. दिनक्रम व्यस्त राहील. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. वृश्चिक:

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. धनू:

समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. मकर:

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे.  निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. कुंभ:

अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. अचानक धनलाभ संभवतो. समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. मीन:

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मानसिक शांतता लाभेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies